अयोध्येमध्ये शिवसेनेची किती ताकद : विष्णू कोकजे 

मुंबई – शिवसेना 25 नोव्हेंबरला अयोध्येत रॅली काढून शक्तीप्रदर्शन करणार आहे. परंतु रामजन्मभूमीचा मुद्दा इतक्‍या वर्षांनी अचानक कसा काय आठवला हा प्रश्न मला पडला आहे. अयोध्येमध्ये शिवसेनेची किती ताकद आहे? मुंबईत परप्रांतीयांना झोडायचे आणि तिकडे (उत्तर भारतात) अयोध्येत जाऊन परप्रांतियांच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे काय उत्तरे देणार आहेत, असा टोला विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष माजी न्यायमूर्ती विष्णू कोकजे यांनी लगाविला.

विश्व हिंदू परिषदेच्या रुग्ण सेवा सदनाचा आज वर्धापनदिन होता. या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कोकजे म्हणाले, शिवसेना राम मंदिराचा मुद्दा हायजॅक करायचा प्रयत्न करत आहे. परंतु असा मुद्दा हायजॅक करण्याची ताकद सेनेकडे नाही. पत्रकार परिषदा घेऊन राम मंदिर बनत नाही.

-Ads-

शिवसेनेने आधी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बांधावे. त्यानंतरच अयोध्येकडे लक्ष द्यायला हवे.राम मंदिराबाबत ते म्हणाले की, केंद्र सरकारने राम मंदीराबाबत अध्यादेश काढायला हवा. न्यायालयाच्या निकालांची आणि प्रक्रियांची किती दिवस वाट पहाणार? सरकारने राम मंदीराबाबत कायदा करायला हवा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)