अयोध्येत राम मंदिर झाले पाहिजे : रामदास आठवले

उरुळी कांचन – अयोध्येत राम मंदिर झाले पाहिजे. तसेच सर्व धर्मासाठी सुध्दा विविध मंदिर झाली पाहिजे .मंदिरामुळे सर्व समाज्यातील सर्व नागरीक एकञीत राहतात. त्यामुळे अयोध्येत राम मंदिर झाले पाहिजे असे मत सामाजिक न्याय मंञी रामदास आठवले यांनी उरुळी कांचन येथील सभेत केले. उरुळी कांचन येथे संविधान दिना निमित्ताने जेष्ठ नागरिकांचा सत्कार संलोखा परिषद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

उरुळी कांचन येथे संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सामाजिक न्याय मंञी रामदास आठवले आर पी आय चे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, पच्मिम महाराष्ट्र अध्यक्ष परशुराम वाडेकर उपमहापौर सिध्दार्थ देडें आमदार बाबुराव पाचण युवा नेते व विधाथी संघटनेचे अध्यक्ष अजिंक्‍य कांचन नियोजन समितीचे अध्यक्ष दादासाहेब सातव रोहिदास उदरे निलेश शेलार विशाल शेलार उमेश कांबळे प्रविण ओव्हाळ बाबा मोरै शक्ती बडेकर सह मान्यवर उपस्थित होते.

-Ads-

या वेळी आमदार बाबुराव पाचण म्हणाले की भारताचे संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चांगले तयार केले आहे. त्यामुळे देशातील नागरीकाचे संरक्षण होत आहे. देश एक संघ राहण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून सर्वांनी एकञ राहवे. डॉ आंबेडकर देशाचे हित पाहून ही संविधान तयार केले त्याचा सर्वांनी आदर करावा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
18 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
12 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
7 :blush: Great
5 :cry: Sad
47 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)