अयोध्येत धोक्‍याचा इशारा-साधूच्या वेषात दहशतवादी येण्याची शक्‍यता 

प्रातिनिधिक छायाचित्र

नवी दिल्ली: अयोध्येत साधूच्या वेषात दहशतवादी येण्याची शक्‍यता व्यक्त करत गुप्तचर विभागाने धोक्‍याचा इशारा देण्यात आला आहे. राम मंदिर मुद्‌द्‌यआवरून अयोध्येत भक्तजनांचा महासागर लोटला आहे. या काळात दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता गृहित धरून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

रामभक्‍तांमध्ये मिसळून दहशतवादी अयोध्येत प्रवेश करण्याची शक्‍यता असल्याची माहिती मिळाली असल्याने गुप्तचर विभागाने अतिदक्षतेचा इशारा दिलेला आहे. साधुसंताच्या अयोध्येत होणाऱ्या धर्मसभेच्या पार्श्‍वभूमीवर हा धोका अधोरिखित करण्यात आलेला आहे.

-Ads-

त्यासाठी अयोध्येत एटीएस (अँटि टेररिस्ट स्क्वाड) चे कमांडोज तैनात करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर गुप्तचर संस्थेला अतिदक्षतेच्या इशाऱ्यासह सक्रिय करण्यात आलेले आहे. सुमारे एका आठवड्यापूर्वी आयबीने दिलेल्या इशाऱ्यानंतर उत्तर प्रदेश पोलीसही सज्ज झालेले असून खासकरून येणाऱ्या ट्रेन्सवर बारकाईने लक्ष देण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)