अयोध्येत उभारणार १५१ मीटर श्रीरामांचा भव्य पुतळा: योगी आदित्यनाथांची घोषणा

अयोध्या – जगातील सर्वात उंच सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारल्यानंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही लवकरच १५१ मीटर उंच भगवान श्रीरामांचा पुतळा उभारणार असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये होत्या. यावर आज योगी आदित्यनाथ यांनी शिक्कामोर्तब केले आहे. प्रभू श्रीरामांचा पुतळा अयोध्यानगरीची ओळख बनेल, असे योगी आदित्यनाथ यांनी पत्रकारांशी बोलताना म्हंटले आहे. यासाठीच्या जागेबाबत चर्चा चालू आहे.

योगी आदित्यनाथ यांनी म्हंटले कि, पूजेसाठीची श्रीरामांची मूर्ती वेगळी असेल. परंतु, श्रीरामांचा एक असा पुतळा उभारला जाईल जी अयोध्येची ओळख बनेल. यासाठीची जागा अद्याप निश्चित झाली नसून चर्चा चालू आहे. सुत्रांनुसार, भगवान राम यांच्या पुतळ्याचे कामही मूर्तिकार राम सुतार यांना देण्यात येणार आहे. राजाच्या स्वरूपात धनुर्धारी असे श्रीराम यांच्या पुतळ्याचे स्वरूप असणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, मंगळवारी अयोध्येत दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी ३ लाख १ हजार १५२  दिवे लावण्यात आले होते. याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)