अयोध्येची जागा कॉंग्रेसने आधीच अधिग्रहण केली 

भाजपा प्रदेशाध्यक्ष दानवेंचा पत्रकार परिषदेत घणाघाती आरोप

हिंगोली  – अयोध्येतील राम मंदिराची जागा कॉंग्रसने आधीच अधिग्रहण केल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. हिंगोली या त्यांच्या लोकसभा निवडणूक मतदार संघात शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा आरोप केला.

दानवे म्हणाले की, अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा हा कॉंग्रेसने पूर्वीच बळकावला असून त्यामुळे राम मंदिर उभारणीसाठी विलंब होत आहे. लोकसभा मतदार संघातील कामाचा आढावा घेण्यासाठी आलेले असताना भारतीय जनता पक्षाच्या सरकारने मागील चार वर्षाच्या केलेल्या विकासकामांबाबत दानवे यांनी समाधान व्यक्‍त केले. त्यामुळे पुढील लोकसभा 2019 ची आम्हीच मोठया मताधिक्‍क्‍याने जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्‍त केला आहे.

यावेळी संघटन मंत्री भाउराव देशमुख , आ.तानाजी मुट्‌कुळे, प्रदेशमंत्री विजयराव पुराणिक , शिरीष बोराळकर , नगराध्यक्ष बावराव बांगर , माजी आ.गजाननराव घूगे, माजी खासदार सूर्यकांता पाटील, माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी खासदार शिवाजी माने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)