अयोध्या, वाराणसीनंतर उद्धव ठाकरेंच्या पंढरपूर दौऱ्याकडे महाराष्ट्राचे लक्ष  

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्यावरून मोदी सरकारला चांगलेच घेरल्याचे दिसून येत आहे. उद्धव ठाकरे नुकतेच अयोध्येत जाऊन आल्यानंतर तीन दिवसापूर्वी थेट पंतप्रधानांच्या मतदार संघात जाऊन आले. आज पुन्हा राम मंदिराचा मुद्दा घेऊन पंढरपूरच्या विठूरायाला साकडं घालणार असल्याचे पत्रकार परिषेदेत शिवसेनेच्या  मंत्र्यांकडून सांगण्यात आले.

पंढरपूर दौऱ्यावर आम्ही चंद्रभागेच्या  परिसराची  सफाई  करणार आहोत. तसेच २० कोटीमध्ये पुरुष आणि  महिलांसाठी दोन स्वतंत्र स्वछतागृह उभारणार असून अंघोळ झाल्यानंतर भाविकांसाठी कपडे बदलण्याची व्यवस्थाही करणार आहे.  उद्धव ठाकरे चंद्रभागेची आरती करून हजारो दिवे चंद्रभागेत सोडणार असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी पत्रकार परिषेदेत सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंढरपूरमध्ये पुजारी, साधूसंतासोबत धर्मसभेचे आयोजन करण्यात आले असून पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन महाराष्ट्राच्या जनतेस निर्मळ, चांगले दिवस यावेत यासाठी पांडुरंगाला साकडे घालणार आहोत. अयोध्येची वारी झोपलेल्या कुंभकर्णास जागे करण्यास होती. पंढरपूरची वारी सरकारला जागे करण्यासाठी नाही तर घालवण्यासाठी आहे. मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सूत्रे हाती घेताच शेतकर्‍यांना कर्जमाफी तर केलीच पण ६०  वषें पूर्ण केली अशा दहा लाख शेतकर्‍यांना पेन्शन देण्याची घोषणा केली. आमचा विठोबा मध्य प्रदेशातील शेतकर्‍यांना पावतो, पण येथील शेतकर्‍यांवर रुसतो असे मानायला आम्ही तयार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)