अयोध्या वाद : मागील चार वर्षापासून सरकार झोपले होते का?

कपिल सिब्बल यांचा मोदी सरकारवर निशाणा 

नवी दिल्ली – अयोध्येतील वादग्रस्त जागेवरील मालकीच्या संबंधातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी महिन्यापर्यंत पुढे ढकलली आहे. या निर्णयानंतर राम मंदिरासंदर्भात अध्यादेश काढावा अशी मागणी जोर धरत आहेत. यावर अयोध्या प्रकरणावर निर्णय न्यायालय करेल, कोणताही राजकीय पक्ष नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी म्हंटले आहे. शिवाय, मागील चार वर्षापासून सरकार झोपले होते का? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कपिल सिब्बल म्हणाले कि, अयोध्येप्रकरणी न्यायालय निर्णय देईलच. त्याआधी हे भाजप किंवा काँग्रेसद्वारे निश्चित केले जाऊ शकत नाही. सरकारला अध्यादेश आणायचा असेल तर आणावा. परंतु, सरकार मागील चार वर्षापासून झोपले होते का? निवडणूक जवळ आली कि राम मंदिराचा मुद्दा उचलला जातो, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, याआधी केंद्रीय मंत्री गिरीराजसिंह यांनी ‘हिंदुंचा राम मंदिराविषयीचा संयम आता संपत चालला आहे’,अशा शब्दात इशारा दिला होता. तर दुसरीकडे कॉंग्रेसकडून मात्र हा विषय मतपेढीच्या राजकारणाशी न जोडता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहण्याचा सबुरीचा सल्ला दिला जातो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)