अयोध्या मक्का-मदिनेत नसून आमच्या हिंदू भूमीतच- शिवसेना

रामाच्या नावावर मतांचा कटोरा घेऊन दारोदार फिरावे व निवडणुकांचा मोसम येताच सभा-संमेलनांतून ‘जय श्रीराम’च्या घोषणा द्याव्यात ही जुमलेबाजी आमच्या रक्तात नाही

मुंबई: भारतीय जनता पक्षाने अयोध्येत राम मंदिर उभारणीची तारीख जाहींर करावी असे आव्हान शिवसेनेने भाजपला पुन्हा दिले आहे. राम मंदिर प्रकरणात भाजपने अध्यादेश काढावा अशी मागणीही शिवसेनेने केली आहे. शिवसैनिकांनी रामाच्या जन्मभुमीवर असलेले बाबर राज्य उदध्वस्त केले याचे भाजपच्या सत्ताधाऱ्यांना कौतुक आणि अभिमान असला पाहिजे. अयोध्या मक्का-मदिनेत नसून आमच्या हिंदू भूमीतच आहे.  असेही शिवसेनेने आपल्या मुखपत्रातील अग्रलेखात म्हटले आहे.

“आमच्या अयोध्या यात्रेने कुणाचे ‘ब्लडप्रेशर’ वाढले आहे तर मुठीतील राजकीय हिंदुत्वाची वाळू सरकू लागल्याने काहींच्या काळजाचे ठोके वाढले आहेत. राममंदिर हा विषय असा हातून निसटू लागला तर 2019च्या रोजीरोटीचे काय, या पक्षघाती झटक्याने अनेकांच्या जिव्हा पांगळ्या झाल्या. तेव्हा काहीही करून शिवसेनेस रोखा अशी गिधाडे ज्यांच्या मनात फडफडू लागली आहेत त्यांना आमचा पुनःपुन्हा तो आणि तोच सवाल आहे की, हे इतके कष्ट घेऊन कारस्थान करण्यापेक्षा सरळ अध्यादेश काढून राममंदिर निर्मितीची तारीखच का जाहीर करीत नाही? आमच्या अयोध्या यात्रेमुळे अनेकांच्या नाडीचे ठोके चुकले आहेत व अनेकांच्या नाड्या सुटल्या आहेत. म्हणूनच आम्ही सांगतोय, ‘ठाकरे’ अयोध्येत निघाले आहेत, पण मंदिर निर्माणाची तारीख तुम्हीच आम्हाला सांगा”, असे शिवसेनेने  स्पष्ट केले आहे.

शिवसेना महाराष्ट्रातून व देशभरातून अयोध्येत पोहोचत आहे ते काही राजकारण करण्यासाठी नाही. रामाच्या नावावर मतांचा कटोरा घेऊन दारोदार फिरावे व निवडणुकांचा मोसम येताच सभा-संमेलनांतून ‘जय श्रीराम’च्या घोषणा द्याव्यात ही जुमलेबाजी आमच्या रक्तात नाही, अश्या शब्दात शिवसेनेने भाजपला डिवचले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
2 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)