अयोध्या प्रकरण : वादग्रस्त जागा वगळता उर्वरित जागेवरील स्थगिती हटवावी – केंद्र सरकार

नवी दिल्ली – अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर निर्मितीबाबत केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. रामजन्मभूमी- बाबरी मशीद वादाप्रकरणी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. यामध्ये २. ७७ एकरची वादग्रस्त जागा वगळता ६७ एकर जागा रामजन्मभूमी न्यासला द्यावी, अशी विनंती केंद्र सरकारने न्यायालयाला केली आहे.

अयोध्येतील वादग्रस्त ठरलेली २.७७ एकर जागा अलाहाबाद उच्च न्यायालयाने राम लल्ला, सुन्नी वक्‍फ बोर्ड, आणि निर्मोही आखाडा याना समप्रमाणात विभागून दिली आहे. त्यावर १४ अपिले प्रलंबित आहेत. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. केंद्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात नवा अर्ज दाखल करण्यात आला असून यात २. ७७ एकरची वादग्रस्त जागा वगळता ६७ एकर जागा रामजन्मभूमी न्यासला द्यावी, असे केंद्र सरकारने न्यायालयाला सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील घटनपीठाच्या पाच न्यायाधीशांपैकी एक न्यायाधीश उपलब्ध नसल्याने अयोध्या प्रकरणाची मंगळवारी होणारी सुनावणीही पुढे ढकलली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)