अयोध्या प्रकरणाची सुनावणी १० जानेवारीपर्यंत टळली 

नवी दिल्ली – अयोध्येतील वादग्रस्त जागेवरील मालकीच्या संबंधातील आजची महत्वपूर्ण सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे. त्यामुळे या प्रकरणी आता १० जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. या प्रकरणी सुनावणी करण्यासाठी नव्या पीठाचे गठन करण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्य याचिकांवरील अंतिम सुनावणीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.

सरन्यायाधिश रंजन गोगोई आणि एस. के. कौल यांच्या खंडपीठासमोर आज ही सुनावणी झाली. मात्र केवळ ६० सेकंदामध्ये याप्रकरणाची सुनावणी १० जानेवारीपर्यंत पुढे ढकलली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अयोध्येतील जागेच्या वादाच्या संबंधात अलहाबाद उच्च न्यायालयाने जागेचे त्रिभाजन करून 2.77 एकर जागा रामलल्ला, सुन्नी वक्‍फ बोर्ड आणि निर्मोही आखाडा या तीन पक्षकारांना समप्रमाणात वाटून देण्याचा निर्णय दिला होता. त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका बाबरी मशिद कृती समिती आणि अन्य संबंधीत संघटनांनी दाखल केल्या आहेत.अशा एकूण चौदा आव्हान याचिका या अनुषंगाने दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावरील सुनावणी पाच न्यायाधिशांच्या खंडपीठाकडे सोपवण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका या आधीच फेटाळण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)