अयोध्या प्रकरणाची सुनावणी 29 ऑक्‍टोबरपासून

घटनापिठाकडे प्रकरण सोपवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली – मशिद किंवा प्रार्थनास्थळ हे इस्लामचा अविभाज्य भाग नसण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची याचिका पाच सदस्यीय घटनापिठाकडे सोपवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. मशिद हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असा निकाल 1994 साली सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्या निर्णयाचा फेरविचार करण्याची वेळ अयोध्या प्रकरणाच्या निमित्ताने आली आहे. मात्र सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पिठाने 2 विरुद्ध 1 अशा बहुमताने हे प्रकरण घटनापिठाकडे न सोपवण्याचा निर्णय घेतला. तर अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीला 29 ऑक्‍टोबरपासून सुरुवात केली जाणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

अयोध्या प्रकरणाचा विचार पुराव्याच्या आधारेच केला जायला हवा. मशिद आणि इस्लामच्या संबंधांबाबत 1994 साली दिलेल्या निकालाचा अयोध्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
न्या. एस. अब्दुल नझीर यांनी मात्र सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्या. अशोक भूषण यांच्याशी मतभिन्नता व्यक्‍त केली आहे. मशिद हा इस्लामचा अविभाज्य भाग आहे की नाही याचा निर्णय धार्मिक श्रद्धांच्या आधारे घ्यायला हवा. त्यासाठी व्यापक विचार आवश्‍यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान अयोध्या प्रकरणी अलाहबाद उच्च न्यायालयाने 2010 साली दिलेल्या निकालावरील आव्हान याचिकांवर सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय पिठासमोर सध्या सुनावणी सुरू होती. त्या दरम्यानच इस्लाममधील मशिदीच्या स्थानाचा मुद्दा उपस्थित झाला होता. आता अयोध्या प्रकरणातील वादाचा निर्णय नव्याने स्थापन झालेल्या तीन सदस्यीय पिठासमोर 29 ऑक्‍टोबरपासून होणार आहे. सध्याचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा 2 ऑक्‍टोबर रोजी निवृत्त होत असल्याने हे नवीन पिठ स्थापन केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)