अयोध्या प्रकरणाचा निकाल काहीही लागला तरी तो शांतपणे स्विकारा

शिया धर्मगुरू मौलाना कल्बे सादिक यांचा सल्ला

नवी दिल्ली :  अयोध्या केस प्रकरणात निकाल आपल्या बाजूने लागला नाही. तर, तो शांतपणे स्विकारा आणि न्यायालयाचा सन्मान करा, असे मत शिया धर्मगुरू मौलाना कल्बे सादिक यांनी व्यक्त केले आहे. तसेच, जर हा निकाल मुस्लिमांच्या बाजूने आला तरीसुद्धा मुस्लिमांनी ही जमीन आनंदाने हिंदूंच्या मंदिरासाठी द्यावी, असेही मौलाना कल्बे सादिक यांनी म्हटले आहे.
एका कार्यक्रमादरम्यान, बोलताना धर्मगुरू सादिक यांनी हे मत व्यक्त केले आहे. काही दिल्यामुळेच काही मिळत असते. असे केले तर, आपण कोट्यवधी हिंदूंचे हृदय जिंकू शकतो, असेही ते म्हणाले. या वेळी कार्यक्रमास उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कल्बे यांच्या विधानाचे कौतूक केले. हर्षवर्धन म्हणाले, हे मत व्यक्त करून मौलाना साहेबांनी सर्वांचे मन जिंकले आहे. भगवान श्रीराम हे केवळ हिंदू, मुस्लिमांचाच नव्हे तर, संपूर्ण भारताचा आत्मा असल्याचेही मंत्री. डॉ हर्षवर्धन यांनी सांगितले.
दरम्यान, राम जन्मभूमी प्रकरणावर ११ ऑगस्टला तबबल ७ वर्षानंतर सुनावनी झाली. सुनवाईदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षकारांशी संवाद साधत म्हटले होते की, न्यायालय पहिल्यांदा दोन मुख्य पक्षकारांची ओळख करेन.न्यायालयाने   ऐतिहासीक दस्तऐवजांच्या अनुवादासाठी तीन महिन्यांची वेळ दिली आहे. या प्रकरणी पूढील सुनवाई ५ डिसेंबरला होणार आहे. यात पहिल्यांदा ८ ऑगस्टला शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रही दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारले जावे तर, याच परिसरातील मुस्लिमबहूल भागात मस्जिद उभारली जावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)