‘अयोध्या नही, कर्जमाफी चाहिए’ : दिल्लीत शेतकऱ्यांचा लॉन्ग मार्च  

नवी दिल्ली – संपूर्ण कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव द्या… अशा विविध मागण्यासाठी देशभरातील २०० हून अधिक शेतकरी संघटनांकडून बुधवारपासून दिल्लीत आंदोलन सुरु आहे. यासाठी देशभरातून हजारोच्या संख्येने शेतकरी आंदोलनात सामील झाले असून आज रामलीला मैदान ते संसद भवन असा लॉन्ग मार्च काढला आहे.

‘अयोध्या नही, कर्जमाफी चाहिए’ अशा घोषणांनी शेतकऱ्यांनी परिसर हादरवून सोडला आहे. शेतकऱ्यांच्या लॉन्ग मार्चमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री व आप नेते अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्स नेता फारूक अब्दुलासह अनेक नेते सामील होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

-Ads-

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या 
– शेतीविषयक समस्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा
– स्वामिनाथन आयोग लागू करावा
– शेतकऱ्यांना कर्जमाफी
– शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)