नवी दिल्ली: अयोध्या केसची सुनावणी करणारे विशेष न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव यांची बढती रोखण्यात आली आहे. अयोध्या केसची सुनावणी कधी पूर्ण होणार असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाने सुरेंद्र कुमार यादव यांना केला आहे. याचे उत्तर सर्वोच्च न्यायालयाने मोहरबंद लिफाफ्यात मागितले आहे.
विशेष न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे अर्ज करून बढतीची मागणी केली होती, त्याच्या उत्तरात सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या केसच्या सुनावणीबाबत विचारणा केली. न्यायमूर्ती आर एफ नरिमन आणि इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. वकील रवी सिकरी आणि मयूरी रघुवंशी यांनी विशेष न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव यांची बाजू सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली होती.
सुरेंद्र कुमार यादव यांची गेल्यावर्षी जून महिन्यात बदायूंचे जिल्हा न्यायाधीशपदी नियुक्ती आणि बदलीचा आदेश निघाला होता, परंतु त्याच दिवशी दुसऱ्या एका आदेशाने नियुक्ती आणि बदली पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली. अयोध्या केसचा निकाल लागेपर्यंत न्यायाधीशांची बदली होऊ नये हा त्यामागचा हेतू होता.
बढती मागताना विशेष न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव यांनी आपली 28 वर्षांची निष्कलंक कारकीर्द असल्याचा आणि आपण नवृत्तीच्या वयाकडे झुकत असल्याचा उल्लेख केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)