अमोल काळेच्या पोलीस कोठडीत वाढ 

कोल्हापूर – कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने आज पुन्हा वाढ केली आहे. त्याला 29 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने आज दिली आहे. दरम्यान अमोल काळे याला मोठ्या पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले. कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी अमोल काळे याला कोल्हापूर एसआयटीने गेल्या आठवड्यात अटक केली होती.

यावेळी काळे याला कोल्हापूरच्या न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. तपासा दरम्यान पोलीस कोठडीमध्ये काळे याने कोणतेही सहकार्य केले नसल्याचे माहिती सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी न्यायालयात दिली.

-Ads-

त्याबरोबरच या प्रकरणांमध्ये या हत्येमध्ये वापरले गेलेले अग्निशस्त्र हे मध्यप्रदेशमधून खरेदी केल्याचा संशय असल्याने तोही तपास करणे गरजेचे असल्याने आणखी सात दिवसाची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी न्यायालयात केली. दोन्ही बाजूच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने संशयित आरोपी अमोल काळे याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)