अमेरिकेमध्ये विमानच झाले चोरी

नवी दिल्ली – आतापर्यंत तुम्ही कार किंवा बाईक चोरी ऐकली असेल पण कधी विमानच चोरी झाल्याचे ऐकले आहे का? नाही ना. परंतु अमेरिकास्थित वॉशिंग्टन शहरात अशीच एक घटना घडली आहे. विमानतळावरील एका कर्मचाऱ्याने विमान चोरी करत आकाशात उड्डाण घेतले. या घटनेने विमानतळावरील नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली होती. यानंतर या मार्गावरील सर्व विमानसेवा थांबविण्यात आल्या.

वृत्तानुसार, एका संदिग्ध व्यक्तीने अलास्का एअरलाईन्सचे एक पॅसेंजर विमान सिएटल-टकोमा विमानतळावरून स्थानिक वेळेनुसार ८ वाजता चोरी करून आकाशात उड्डाण घेतले. या घटनेची माहिती मिळताच या मार्गावरील सर्व विमानसेवा थांबविण्यात आल्या. व तातडीने या विमानाचा सैन्याच्या दोन एफ-१५ एअरक्राफ्ट विमानांनी पाठलाग करण्यास सुरुवात केली. सूत्रानुसार हे चोरी केलेले विमान वॉशिंग्टनजवळील पीयर्स काउंटी स्टेटच्या केट्रोन बेटावर क्रॅश झाले. या विमानात कोणीही नसल्याने जीवितहानी झालेली नाही.

-Ads-

सूत्रानुसार, विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेमागील आतंकवाद्यांचा हात असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. दरम्यान, या मार्गावरील सर्व विमानसेवा पूर्ववत होत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)