अमेरिकेमध्ये वंशवादाला स्थान नाही- इव्हांका ट्रम्प 

वॉशिंग्टन: श्‍वेतवर्णियांचे वर्चस्व, वंशवाद किंवा नवनाझीवादाला अमेरिकेमध्ये कोणतेही स्थान असणार नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या आणि व्हाईट हाऊसच्या सल्लागार इव्हांका ट्रम्प यांनी म्हटले आहे. आतापर्यंत ट्रम्प यांनी वंशवादाचा इतक्‍या थेटपणे निषेध केलेला नव्हता. पण इव्हांका ट्रम्प यांनी ही निषेधाची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे, हे विशेष. व्हर्जिनिया प्रांतातील चार्लोत्सविल येथील श्‍वेतवर्णियांच्या वर्चस्व रॅलीनंतर व्हाईट हाऊसच्या बाहेर उसळलेल्या हिंसाचाराच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने इव्हांका ट्रम्प यांनी ट्विटरवरून ही भूमिका मांडली आहे.
चार्लोत्त्सविल इथे वर्षभरापूर्वी द्वेषाच्या, वंशवादाच्या आंणि धर्मांध हिंसेचे चित्र बघायला मिळाले होते. गरिबी, अभिव्यक्‍ती स्वातंत्र्य आणि मतभिन्नतेचे स्वातंत्र्य जपणाऱ्या अमेरिकेमध्ये राहण्याचे भाग्य अमेरिकेतील नागरिकांना लाभले आहे. अमेरिकेमध्ये वर्चस्व, वंशवाद आणि नव नाझीवादाला आपल्या देशामध्ये काहीही स्थान असणार नाहे. एकमेकाचा द्वेष करण्याऐवजी आम्ही एकमेकांना मदत करू, समाजाला समर्थ बनवण्याचा प्रयत्न करू आणि अमेरिकेने आपली पूर्ण क्षमता गाठावी, यासाठी अमेरिकेतील प्रत्येक नागरिकाला मदत करू, असे इव्हांका ट्रम्प यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
अध्यक्ष ट्रम्प यांनी चार्लोत्त्सविल येथील हिंसाचाराचा अद्याप निषेध केलेला नाही. दोप्न्÷हई बाजूंचे लोक चाम्गले होते. असे ते म्हणत राहिले आहेत. या जाळपोळीच्या घटनेनंतर मात्र वंशवाद वाईट आहे, असे ते म्हणाले होते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)