अमेरिकेबरोबर शांतिवार्तेच्या तयारीत तालिबान

पेशावर (पाकिस्तान) – तालिबान अमेरिकेबरोबर शांतिवार्ता करण्याच्या तयारीत असल्यची माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांऩी दिली आहे. तालिबानबरोबर शांतिवार्तेशी संबंधित या दोन अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले, की अफगाणिस्तातील संघर्ष थांबविण्याच्या दृष्टीने तालिबान पावले उचलीत आहे.

अमेरिकेबरोबर चर्चेसाठी तीन ते चार नेत्यांचे एक प्रतिनिधी मंडळ आणि चर्चेत बोलायचे विषय निश्‍चित करण्यासाठी तालिबानी नेत्यांची एक बैठक होत असल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तालिबान आणि अमेरिकन अधिकारी यांच्यात होणाऱ्या बैठकीत कैद्यांच्या अदलाबदलीबाबत चर्चा होण्याचे शक्‍यताही त्यांनी बोलून दाखवली आहे.

कैद्यांच्या अदलाबदलीच्या बोलण्याबाबत अमेरिकेचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास तालिबान आणि अमेरिका यांच्यात चर्चेची आणखी एक फेरी होऊ शकेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकेबरोबरच्या शांतिवार्तेसाठी तालिबानच्या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व तालिबानच्या कतार येथील राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टानक्‍झी करण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)