अमेरिकेबरोबरच्या ट्रेड वॉरमुळे हैराण चीनला हवी भारताची साथ 

बीजिंग: अमेरिकेबरोबरच्या ट्रेड वॉरमुळे हैराण चीनला आता भारताच्या साथीची आवश्‍यकता वाटू लागली आहे. तशा प्रकारचे वक्तव्य भारतातील चिनी दूतावासाचे प्रवक्ते जी रॉंग यांनी केले आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि उचित पद्धतीने व्यापाराच्या नावाखाली अमेरिकेने चालवलेल्या सुरक्षावादाचा फक्त चीनच्याच अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम होत नाही, तर त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे.
चीन आणि भारत या दोन विकसनशील आणि उभरत्या अर्थव्यवस्था सुधारणांच्या एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहेत. दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांना एका स्थिर बाह्य वातावरणाची आवश्‍यकता आहे. चीन आणि अमेरिकेच्या व्यापारविषयक विवादाबाबत विचारलेल्या प्रश्‍नांना ते उत्तर देत होते.
गेल्या महिन्यात चीनच्या 200 अब्ज डॉलर्सच्या आयातीवर अमेरिकेने अतिरिक्त शुल्क लावले होते. उत्तरादाखल चीनने अमेरिकेच्या 60 अब्ज डॉलर्स किमतीच्या आयातीवर अतिरिक्त शुल्क्क लागू करण्याची घोषणा केली होती. जर चीनने हे अतिरिक्त शुल्क लागू केले, तर चीनच्या आनखी 260 अब्ज डॉलर्सच्या आयातीवर अमेरिका अतिरिक्‍त शुल्क लागू करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत आणि चीनने परस्पर सहकार्य वाढवण्याची आवश्‍यकता असल्याचे जी रॉंग यांनी म्हटले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)