अमेरिकेने 11 देशांच्या निर्वासितांवरील बंदी उठवली

वॉशिंग्टन – अमेरिकेने 11 देशातील निर्वासितांवर अमेरिकेत प्रवेश करण्यास घातलेली बंदी उठवली आहे. तथापी या देशातील जे लोक अमेरिकेत येऊ इच्छित आहेत त्यांची अत्यंत कडक छाननी केली जाणार आहे. हे अकरा देश नेमके कोणते ते मात्र जाहीर करण्यात आलेले नाही पण त्यात 10 मुस्लिम बहुल देशांचा समावेश आहे. अकरावा देश उत्तर कोरिया हा आहे असे सांगण्यात येते.

अमेरिकेच्या होमलॅंड सिक्‍युरिटी विभागाचे प्रमुख क्रिस्टेन नीलसेन यांनी सांगितले की असे जरी असले तरी अमेरिकेत नेमके कोण प्रवेश करणार आहे हे आम्ही अत्यंत काटेकोरपणे जाणून घेणार आहोत. आमच्या उदार भूमिकेचा गैरफायदा घेऊन काही विघातक घटक अमेरिकेत शिरणार नाहीत याची आम्हाला काळजी घ्यावी लागेल असेही त्यांनी नमूद केले आहे. या अकरा देशातील नागरीकांना गेल्या ऑक्‍टोबर महिन्यात अमेरिकेत बंदी घालण्यात आली होती. या देशांमध्ये इजिप्त, इराण, इराक, माली, उत्तर कोरिया, सोमालिया, दक्षिण सुदान, सुदान, सिरीया आणि येमेन या देशांचा समावेश होता. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यापासून बाहेरील देशांच्या नागरीकांना तेथे प्रवेश करण्यास मोठ्या प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यांच्या अमेरिका प्रवेशाची प्रक्रिया अत्यंत काटेकार करण्यात आली आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)