अमेरिकेने भारताबरोबरची चर्चा टाकली लांबणीवर

नवी दिल्ली – अमेरिकेने भारताबरोबरची प्रस्तावित उच्चस्तरीय चर्चा लांबणीवर टाकली आहे. तसे आज अमेरिकेकडून अचानकपणे कळवण्यात आले. त्यासाठी अपरिहार्य कारण पुढे करण्यात आले आहे.

भारत आणि अमेरिकेमधील उच्चस्तरीय चर्चा 6 जुलैला आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन अमेरिकेला जाणार होत्या. त्या अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मायकेल आर.पॉम्पेओ आणि संरक्षणमंत्री जेम्स मॅटीस यांच्याबरोबरच्या चर्चेत सहभागी होणार होत्या. ही चर्चा पुढे ढकलण्यात आल्याबद्दल पॉम्पेओ यांनी सुषमांशी संपर्क साधूून दिलगिरी व्यक्त केली. आता द्विपक्षीय चर्चेसाठी नव्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दोन्ही देशांमधील सुरक्षा आणि संरक्षणविषयक सहकार्य बळकट करण्याच्या उद्देशाने या उच्चस्तरीय चर्चेला महत्व आहे. या नव्या स्वरूपाच्या चर्चेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी केलेल्या अमेरिका दौऱ्यावेळी सहमती झाली. त्यानंतर या चर्चेची वेळ निश्‍चित करण्यासाठी दोन्ही देशांकडून बऱ्याच तारखांचा विचार झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)