अमेरिकेने पाक लष्कराच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम थांबवला

इस्लामाबाद – अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानी लष्कराला प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम थांबवला आहे. गेली अनेक दशके हा कार्यक्रम सुरू होता. अलिकडेच पाकिस्तानने रशियाशी लष्करी प्रशिक्षणाविषयी करार केल्यामुळे ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती काही वृत्तपत्रांनी दिली आहे.

रशिया आणि पाकिस्तान यांच्या लष्कराची संयुक्त कवायत नुकतीच झाली त्यावेळी पाकिस्तानी लष्कराला प्रशिक्षण देण्याच्या करारावर गेल्या मंगळवारी स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे ट्रम्प प्रशासन त्यांच्यावर चिडले आहे. पाकिस्तान हा दहशतवाद्यांसाठी स्वर्ग ठरत आहे अशी जाहीर टिका अध्यक्ष ट्रम्प यांनी गेल्या जानेवारी महिन्यातच केली होंती त्यामुळे दोन्ही देशांतील संबंध अधिक दुरावत चालले आहेत.

तशातच आता पाकिस्तानने रशियाशी जवळीक साधल्याने ट्रम्प यांचे पित्त आणखी खवळले आहे त्यातूनच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)