अमेरिकेने पाकची 1.66 अब्ज डॉलर्सची संरक्षण मदत थांबवली 

वॉशिंग्टन – अमेरिकेने पाकिस्तानची 1.66 अब्ज डॉलर्सची संरक्षण विषयक मदत रोखली आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुचनेवरून ही कार्यवाही करण्यात आली आहे अशी माहिती पेंटॅगॉनने दिली आहे. पाकिस्तानने अलकायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनला जी मदत केली आहे त्यावरून अध्यक्ष ट्रम्प यांनी अलिकडेच मोठी आगपाखड केली होती. त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे.

पेंटॅगॉनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की गेल्या जानेवारी महिन्यापासून अमेरिकेने पाकिस्तानची मदत टप्प्याटप्प्याने रोखण्याची भूमिका घेतली आहे. पाकिस्तानच्या एकूणच भूमिकेवर अमेरिका नाराज आहे त्याचा संदेश त्यांना याद्वारे दिला जात आहे. पाकिस्तानच्या दहशतवादाच्या संबंधातील भूमिकेविषयी अमेरिकेने ज्या चिंता व्यक्त केल्या आहेत त्यावर त्यांनी कोणत्याही प्रभावी उपाययोजना केलल्या नाहीत.

-Ads-

पाकिस्तानातील अनेक दहशतवादी गट शेजारील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात घातपाती कारवाया करतात त्यांना थांबवण्याचा कोणताच प्रयत्न पाकिस्तानने केला नाही उलट काही वेळा त्यांनी या गटांना मदत करण्याचेच काम केले आहे असा आरोप त्यांनी केला. याबाबतीत सहकार्य करण्याचे आश्‍वासन पाकने आम्हाला अनेक वेळा दिले पण केवळ शाब्दिक कृती पलिकडे त्यांनी काहीही केलेले आढळले नाही. आर्थिक टंचाईमुळे सध्या पाकिस्तानी जनतेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आम्हाला त्यांच्याविषयी सहानुभूती आहे. पण त्यांनीही जरा जबाबदारीने वागण्याची गरज आहे असेही त्यांनी पाकला सुनावले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)