अमेरिकेने चीनी मालावर आणखी दहा टक्के आयात कर वाढवला

वॉशिंग्टन – अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध आणखी उग्र झाले असून अमेरिकेने चीनी मालावर आणखी दहा टक्के आयात कर वाढवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अमेरिकेच्या आधीच्या करवाढीला प्रत्युत्तर म्हणून चीनने अमेरिकेच्या 34 अब्ज डॉलर्सच्या मालावर वाढीव दराने कर लागू केला होता. त्याला प्रत्त्युत्तर म्हणून अमेरिकेने ही कृती केली आहे.

तथापी चीननेही पुन्हा अशीच कृती करण्याची धमकी दिली असल्याने या व्यापार युद्धाचा शेवट नेमका काय होणार आहे याचा अदांज अजून या क्षेत्रातील तज्ज्ञांनाही आलेला नाही. अमेरिकेने या आधी चिनी मालावर 25 टक्के जादा कर लागू करण्याचा आदेश जारी केला होता. पण त्याने चिन सरकारवर काहीच परिणाम झाला नाही उलट त्यांनी त्याच्या प्रत्युत्तरात कृती केल्याने अमेरिकाही आता चीनशी होणाऱ्या व्यापाराबाबत अधिक आक्रमक झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)