अमेरिकेत सापडला अत्यंत दुर्मीळ दोन डोकी असलेला रॅटलस्नेक

जोन्सबोरो (आर्कान्सास-अमेरिका) -अत्यंत दुर्मीळ असलेला दोन डोक्‍यांचा अडखड्या साप-रॅटलस्नेक सापडल्याची माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेच्या आर्कान्सास राज्यातील जोन्सबोरो येथील क्विंटीन ब्राऊन आणि रॉडनी केल्सो यांना हा दोन डोक्‍यांचा रॅटलस्नेक त्यांच्या घराजवळच सापडला. तेथे असलेल्या एकूण तीन रॅटलस्नेक्‍सपैकी दोन नेहमीसारखेच होते, पण हा तिसरा मात्र वेगळा होता. त्याला दोन डोकी होती. हा दोन डोकी असलेला रॅटलस्नेक त्यांनी एका बॉक्‍समध्ये पकडला. त्याचे फोटो काढून त्यांनी ते फेसबुकवर अपलोड केले आहेत. ड्यूस असे नाव दिलेला हा रॅटलस्नेक सुमारे 11 इंच लांबीचा आहे.

हा दोन डोक्‍यांचा रॅटलस्नेक त्यांनी नंतर जोन्सबोरो येथील रिज नेचर सेंटरला दिला आहे. दोन डोकी असलेला साप म्हणजे प्रत्यक्षात जोडले गेलेले दोन साप असतात. दोन डोकी म्हणजे दोन डोकी असलेला साप नैसर्गिक वातवरणात फार काळ जगू शकत नाही. कारण दोन मेंदू असल्याने तो कोणताही निर्णय पटकन घेऊ शकत नाही. त्यामुळे शत्रू त्याची सहज शिकार करू शकतात, असे रिज नेचर सेंटरचे शैक्षणिक कार्यक्रम प्रमुख कॉडी वॉकर यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)