न्युयॉर्क – अमेरिकेत व्हीसा फ्रॉड केल्या प्रकरणी तेथील यंत्रणांनी सहा भारतीयांसह अन्य सुमारे तीनशे जणांना अटक केल्याचे वृत्त आहे. अमेरिकेची इमिग्रेशन आणि कस्टम एनफोर्समेंट ऍथॉरिटी आणि रिमुव्हल ऑपरेशन विभाग यांनी सहा राज्यात कारवाई करून एकूण 364 जणांना अटक केली आहे.

इंडियाना, इलिनॉईस, कंसास, केंटुकी, मिसौरी आणि विस्कोसिन प्रांतात या कारवाया करण्यात आल्या. अटक करण्यात अलेल्या मध्ये सहा भारतीय असून अन्यही काही भारतीय जाळ्यात येण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. यातील बहुतेक जण एच 1 बी या व्हिसा प्रणालीच्या घोटाळ्यातील आरोपी आहेत.

त्यांनी अनेकांना अमेरिकेचा बोगस कागदपत्रांच्या आधारे व्हीसा मिळवून देऊन मोठ घोटाळा केला असल्याचे वृत्त आहे. पकडण्यात आलेल्या सहा भारतीयांमध्ये तेथील दोन कंपन्यांच्या एका सीईओचाही समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)