अमेरिकेत वृत्तपत्र कार्यालयावर हल्ला; पाच ठार

अन्नापोलिस – अमेरिकेत ऍनापोलिस शहरातील एका वृत्तपत्र कार्यालयावर करण्यात आलेल्या हल्ल्यात पाच जण ठार झाले तर अन्य नाही जण जखमी झाले आहेत. मेरिलॅंड मध्ये राहणाऱ्या एका मध्यवयीन इसमाने हा हल्ला केला. त्याने बंदुकीच्या सहाय्याने तेथे अंदाधुंद गोळीबार केला आणि हातबॉंबही फेकले.

कॅपिटल गॅझेट नावाच्या वृत्तपत्राचे हे कार्यालय होते. त्याने कोणत्या कारणासाठी हे कृत्य केले याची माहिती मिळालेली नाही. मध्यंतरी काही जणांकडून या वृत्तपत्राला सोशल मिडीयातून धमक्‍या मिळत होत्या. पण धमक्‍या देणाऱ्या इसमांपैकीच हा हल्लखोर आहे किंवा नाही याचा तपशील मात्र अजून उपलब्ध होऊ शकलेला नाही. या इसमाकडून बराच वेळ हा गोळीबार सुरू होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वृत्तपत्रातील बातमीदारांनी सोशल मिडीयावर या हल्ल्याची माहिती दिली. बाहेरून एक इसम काचेच्या दरवाज्यातून आमच्यावर गोळीबार करीत आहेत त्यात आमच्या कार्यालयातील पाच जण बळी पडले असल्याचे त्यांनी कळवले होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. निरपराध पत्रकारांवर करण्यात आलेला हल्ला हा साऱ्या अमेरिकेवरचाच हल्ला आहे असे व्हाईट हाऊसच्या प्रवक्‍त्या सारा सॅंडर्स यांनी म्हटले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)