अमेरिकेत लेटरबॉब कांड चालूच-बर्लिंनगेमध्ये आणखी एक लेटरबॉंब 

सॅन फ्रॅन्सिस्को (अमेरिका): अमेरिकेत लेटरबॉब कांड चालूच आहे. बर्लिंनगेमध्ये आणखी एक लेटरबॉंब सापडला आहे. हा लेटरबॉंब अब्जाधीश डेमॉक्रेट टॉम स्टेयर यांना पाठवण्यात आला होता. सॅन मॅटियो काऊंटीतील बर्लिनगेम पोस्ट ऑफिसात हा संशयित लेटरबॉंब मिळाल्याची माहिती एफबीआय ने दिली आहे. याच पोस्ट ऑफिसमध्ये टॉम स्टेयर यांना पाठवण्यात आलेला आणखी एक लेटरबॉंब 26 ऑक्‍टोबर रोजी मिळाला होता.

नेक्‍स्टजेन अमेरिका आणि आणि नीड टू इंपीच अशा दोन गटांचे संचलन करणाऱ्या हेज फंडाचे टॉम स्टेयर्स व्यवस्थापन करतात. पहिला गट हा स्वच्छ इंधन चळवळीला उत्तेजन देणारा आहे, आणि दुसरा अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग (इंपीचमेंट) चालवण्यासाठी आहे. महाभियोगासाठी सह्या घेण्याचे काम नीड टू इंपीच करत आहे.
अलीकडच्या काळात अमेरिकेत अशा प्रकारचे अनेक लेटरबॉंब मिळाले आहेत आणि ते सर्व डेमॉक्रेटिक नेत्यांना व ट्रम्पविरोधकांना पाठवण्यात आलेले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या प्रकरणी एफबीआयने गेल्या आठवड्यात सीझर सोयोक नावाच्या संशयिताला फ्लॉरिडात अटक केली आहे. 56 वर्षीय सोयोक सध्या तुरुंगातच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)