अमेरिकेत मेडिसनमधील गॅसचा स्फोट

सन प्रायन, (अमेरिका) – अमेरिकेतील मेडिसन शहराच्या उपनगरामध्ये नैसर्गिक वायूच्या वाहिनीला कंत्राटदाराच्या वाहनाने धडक दिल्यामुळे झालेल्या मोठ्या स्फोटात अनेक जण जखमी झाले आहेत. या स्फोटात आतापर्यंत कोणीही मृत झाल्याचे वृत्त नाही. सकाळी 7.15 वाजता झालेल्या या स्फोटामुळे सन प्रायनचा परिसर हादरून गेला. या स्फोटामुळे या परिसरात पाईपद्वारे केला जाणारा गॅसचा पुरवठा थांबवण्यात आला आहे.

स्फोटामुळे जखमी झालेल्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. याच परिसरात राहणाऱ्या महापौरांचे घरही रिकामे करण्यात आले आहे. या परिसरातील वाहतुक रोखण्यात आली असून बघ्यांना घटनास्थळापासून दूर ठेवण्यात आले आहे. याच परिसरात अनेक उद्योग, बार आणि रेस्टॉरंटही आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)