अमेरिकेत मध्यावधी निवडणूकीसाठी मतदान 

वॉशिंग्टन: अमेरिकेत मध्यावधी निवडणूकीसाठी आज मतदान झाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादग्रस्त धोरणांविरोधातील जनमत म्हणून या मध्यावधी निवडणूकांकडे बघितले जात आहे. या निवडणूकांच्या निकालावरच ट्रम्प यांच्या दोन वर्षाच्या कार्यकालाचे विश्‍लेषण केले जाणार आहे. अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहामधील बहुमत कायम ठेवण्यासाठी अध्यक्ष ट्रम्प यांना असलेली ही अखेरची संधी असणार आहे. मैनी, न्यू हॅम्पशायर, न्यू जर्सी, न्यूयॉर्क आणि व्हर्जिनिया या राज्यांमध्ये आज सकाळी 6 वाजता मतदानाला प्रारंभ झाला. “हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज’मधील 435 सदस्यांची आणि वरिष्ठ सभागृह अर्थात “सिनेट’मधील 100 पैकी 35 सदस्य, 36 राज्यांचे गव्हर्नर आणि राज्यांच्या विधानसभांमधील जागांसाठी या मध्यावधी निवडणूका होत आहेत.
सध्या “हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज’ आणि “सिनेट’ या दोन्ही सभागृहांमध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीचे बहुमत आहे. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे बहुमत कायम ठेवण्यासाठी प्रचारामध्ये कोणतीही उणीव राहू दिलेली नाही.
अमेरिकेतील संसदेची रचना भारतातील लोकसभा आणि राज्यसभेसारखीच आहे. “हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज’ मध्येलोकसभेप्रमाणे 435 सदस्य आहेत. येथे रिपब्लिकन पक्षाचे 235 तर डेमोक्रॅटिक पक्षाचे 193 सदस्य आहेत. प्रतिनिधीगृहातील सर्व सदस्यांची निवड दर दोन वर्षांनी होते. ‘राजकीय निरीक्षकांच्या मते “हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज’मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाला विजय मिळू शकतो. तर “सिनेट’मध्ये रिपब्लिकन पक्षाला आपले बहुमत कायम राखता येऊ शकेल. तसे झाले तर प्रतिनिधीगृहामध्ये रिपब्लिकन पार्टीचे संख्याबळ वाढू शकते.
सर्वसाधारणपणे निरस वाटणाऱ्या या मध्यावधी निवडणूकांमध्ये उत्कंठा निर्माण झाली आहे, असा दावा अध्यक्ष ट्रम्प यांनी क्‍लेवलॅन्ड येथील सभेमध्ये केला.
फेसबुकने 115 खाती बंद केली 
अमेरिकेतील मध्यावधी निवडणूकांच्या पार्श्‍वभुमीवर फेसबुकने 115 खातील बंद केली आहेत. प्रत्यक्ष व्यक्‍तीच्या माहितीशी विसंगत असलेली ही खाती विदेशातील गटांनी निवडणूकीत हस्तक्षेप करण्याच्या उद्देशाने तयार केली असावीत, अशा संशयातून ही खाती बंद करण्यात आली आहेत. फेसबुइकतने 30 फेसबुक अकाउंट आणि 85 इन्स्टाग्राम अकाउंट बंद केली आहेत. या अकाउंटबाबत अधिक तपशील मिळवण्यासाठी तपास केला जात आहे, असे फेसबुकने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. इराणशी संबंधित 82 फेसबुक पेजही गेल्या महिन्यात बंद करण्यात आली. ऑगस्ट महिन्यात अशीच 652 फेसबुक पेज बंद करण्यात आली होती. ही अकाउंट रशिया आणि इराणमधील गटांशी संबंधित असल्याचा संशय होता.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)