अमेरिकेत बेपत्ता भारतीय विद्यार्थी आढळला मृतावस्थेत

न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेत कॉर्नेल विद्यापीठाचा बेपत्ता भारतीय विद्यार्थी मृतावस्थेत आढळला आहे. आलाप नरसिपुरा नावाचा हा वीस वर्षे वयाचा इलेक्‍ट्रिकल इंजिनियरिंगचा विद्यार्थी बुधवारपासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह काल इथाका धबधब्यापासून जवळच नदीत सापडल्याचे कॉर्नेल विद्यापीठ पोलिसांनी सांगितले आहे. कॉर्नेल विद्यापीठ पोलीस, न्यूयॉर्क राज्य पोलीस आणि इथाका अग्निशमन दल यांनी संयुक्तरीत्या आलाप नरसिपुराचा तपास चालवला होता.
आलापच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. त्याच्या मृत्यूचा तपास चालू असून त्यात काही घातपाताचा संशय नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मात्र, याबाबतीत आणखी काहीही माहिती पोलिसांनी दिलेली नाही. 17 तारखेला कॉर्नेल विद्यापीठाच्या आवरात त्याला शेवटचे पाहिल्याची माहिती मिळाली आहे. या वर्षी डिसेंबरमध्ये पदवीधर बनणाऱ्या आलापची इंजिनियरिंगमधील मास्टर्स डिग्री करण्याची इच्छा होती असे समजते. कॉर्नेल विद्यापीठचा अल्टिमेट फ्रिस्बी संघांचा तो क्रियाशील सदस्य होता. त्याला फोटोग्राफीचा छंद होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)