नवी दिल्ली – अमेरिकेला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. अमेरिकेला जाणाऱ्या भारतीयांचे प्रमाण कमी होण्याचा प्रकार गेल्या आठ वर्षात प्रथमच झाला आहे. अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने जाहीर केलेल्या अहवालावरून ही गोष्ट उघड झाली आहे. या अहवालानुसार सन 2017 मध्ये 11.4 लाख भारतीय अमेरिकेला गेले. त्याच्या मागील वर्षापेक्षा ही संख्या 5 टक्‍क्‍यांनी कमी आहे.

सन 2009 साली 5.5 लाख भारतीय अमेरिकेला गेले होते. त्याच्या मागील वर्षापेक्षा ही संख्या 8 टक्‍क्‍यांनी कमी होती. तो मंदीचा काळ होता. मात्र त्यानंतरच्या काळात अमेरिकेला जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येत सतत वाढ होत गेली. मात्र अमेरिकेला जाणाऱ्या भारतीयांच्या संख्येतील ही घट तात्पुरती आहे.

सन 2018 ते 2022 या काळात ती सतत वाढत जाणार असल्याचे अमेरिकेच्या वाणिज्य विभागाचे म्हणणे आहे. अमेरिकेत दर वर्षी 7.7 कोटी आंतरराष्ट्रीय पर्यटक येतात. सन 2017 मध्ये अमेरिकेला यापासून 251.4 अब्ज डॉलर्सचे उत्पन्न मिळाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)