अमेरिकेत गेल्या हिवाळ्यात “फ्लू’चे 80,000 बळी

न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेत गेल्या हिवाळ्यात “फ्लू’ आणि फ्लूसदृश आजारांनी सुमारे 80,000 बळी घेतल्याची माहिती सीडीसी (सेंट्‍र फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शन) चे संचालक डॉ. रॉबर्ट रेडफील्ड यांनी एका मुलाखतीत दिली आहे. गेल्या चार दशकातील हा फ्लूच्या बऴींचा उच्चांक असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य अधिकारी ज्या आधारावर मागील वर्षातील फ्लूच्या बळींची संख्या सांगतात, त्यापेक्षा प्रत्यक्ष आकडा दुप्पट आहे, असे वॅंडरबिल्ट विद्यापीठाचे लसीकरण तज्ज्ञ डॉ. विल्यम शाफनर यांनी म्हटले आहे. सीडीसीने जाहीर केलेल्या संख्येपेक्षा प्रत्यक्ष आकडा दुप्पट असल्याचे सांगण्यात आले आहे, मागील वर्षे इतके वाईट होते, की फ्लूची लसही परिणामकारक होऊ शकली नाही, असे तज्ज्ञांचे म्हणंणे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)