अँडोव्ह्र/मेसाच्युसेटस (अमेरिका) – गॅसलाईनमध्ये झालेल्या स्फोटांमुळे अमेरिकेतील बोस्टन शहराजवळ प्रचंड आगी लागल्या आहेत. किमान सहाजण जखमी झाले असून शेकडो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

बोस्टन शहरापासून सुमारे 40 किमी अंतरावरील लॉरेन्स, एंडोवर आणि उत्तर एंडोवर भागांत एकामागून एक झालेल्या या स्फोटांमुळे घरे आणि इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. लागलेल्या आगी नियंत्रणात आणण्यासाठी आठवडाभराचा वेळ लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गॅस पाईप लाईन सेवा बंद करण्यात आली आहे. लॉरेन्स, एंडोवर आणि उत्तर एंडोवर या प्रभावित क्षेत्रातील वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. या आगींमुळे तीन शहरे खाली करावी लागली आहेत.

गॅस पाईप लाईनमधील अतिरिक्त दाबा मुळे या पाईपलाईन्समध्ये स्फोट होऊन या आगी लागल्याचे एंडोव्हर अग्निशामन दलाचे प्रमुख मायकेल मॅन्सफील्ड यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले आहे. आगीवर काबू मिळवण्यासाठी किमान आठवडा तरी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)