अमेरिकेत कुत्री आणि मांजरे खाण्यावर कायद्याने बंदी

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेत कुत्री आणि मांजरे मारून खाण्यावर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकन संसदेने अशी बंदी घालणारा कायदा मंजूर केला. कुत्री आणि मांजरे मांस व्यापारावर बंदी घालण्यात आलेल्या या कायद्याचा भंग केल्यास 5,000 अमेरिकन डॉलर्स ( सुमारे 3,50,000रुपये)दंड करण्यात येणार आहे.

चीन, दक्षिण कोरिया आणि भारतासह सर्व देशांतून कुत्री आणि मांजरांचे मांस आयात करण्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. कुत्री आणि मांजरे ही सोबतीसाठी आणि मनोरंजनासाठी असतात, पण दुर्दैवाने चीनमध्ये दरवर्षी एक कोटी कुत्र्यांची मांसासाठी हत्या केली जाते, असे कॉग्रेस सदस्य क्‍लौडिया टेनी यांनी सांगितले. अशा गोष्टींसाठी आपल्या समाजात मुळीच जागा नाही.

हा कायदा अमेरिकन मूल्यांना अधोरेखित करतो. कुत्री आणि मांजरांशी अशा प्रकारचे क्रूर आणि अमानवी वर्तन आपण मुळीच चालवून घेणार नाही, असे स्पष्ट करूत त्या म्हणाल्या की चीन, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, थायलंड, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, कंबोडिया, भारत आणि अन्य देशांनी कुत्री आणि मांजरांच्या मांसाच्या व्यापारावर बंदी घालणारे कायदे पास करून ते लागू करावेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)