अमेरिकेत ऑस्टिनमध्ये फ़ेडेक्‍स पार्सल स्फोटात दोन जण ठार

टेक्‍सास (अमेरिक़ा) – अमेरिकेत झालेल्या आणखी एका पार्सल स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. टेक्‍सास राज्यातील ऑस्टिन येथे फेडेक्‍स या कुरियर कंपनीच्या पार्सलमध्ये हा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र अलीकडेच अमेरिकेत झालेल्या बॉंबस्फोटांशी या स्फोटाचा काही संबंध नसल्याचे पोलीस आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 2 मार्च रोजी टेक्‍सासमध्ये झालेल्या बॉंबस्फोटामध्ये 2 जण ठार आणि 5 जण जखमी झाले होते. त्यानंतर 20 मार्च रोजीही बॉंबस्फोट झाले होते. पार्सलमध्ये झालेल्या या स्फोटांपूर्वी पार्सल ठीक तऱ्हेने स्कॅन केले गेले नसल्याचे दिसून आले होते.

स्फोट झाल्यानंतर आजूबाजूची दुकाने, स्टोअर्स आणि शॉपिंग मॉल्स बंद ठेवण्यात आले. एका बॅगेत कार्डबोर्डच्या बॉक्‍समध्ये हा बॉंब होता असे गुडविल टेक्‍सास स्टोअरचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गॅरी डेव्हिस यांनी सांगितले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी या प्रकाराच्या मुळापर्यंत जाऊन तपास करण्याचे आदेश दिले आहेत. अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी कंपनी पूर्ण काळजी घेईल असे कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कळवले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)