लॉस अँजेलिस (अमेरिका): हॉलिवूडची अभिनेत्री वनीस मार्केज हिचा पोलीसांच्या गोळीमुळे मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मार्केजने पोलीसांवर नकली बंदूक रोखली होती, तर प्रत्युत्तरदाखल पोलीसांनी केलेल्या गोळीबारात मार्केसचा मृत्यू झाला.
मार्केसच्या घरमालकाने फोन केल्यामुळे पोलीस मार्केसच्या घरी गेले होते. त्यांच्या स्वागतासाठी मार्केस बंदूक रोखून उभी होती. नाइलाजाने पोलीसांना गोळी चालवावी लागली, त्यात मार्केस मरण पावली. तिच्या हातातील बंदूक नकली होती, हे नंतर समजले.
मार्केस काही मानसिक समस्यांमुळे त्रस्त होती. हॉलीवूडस अभिनेता जॉर्ज क्‍लूनीवरील यौनशोषणाच्या आरोपांमुळे ती चर्चेत आली होती. अत्यंत गाजलेल्या ईआर या टीव्ही मालिकेत ती जॉर्ज क्‍लूनीची सहकलाकार होती. ईआरमधील नर्सच्या भूमिकेसाठी ती सदैव आठवणीत राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)