अमेरिकेतील 100 वृत्तपत्रांत एकाच वेळी ट्रम्पविरोधी अग्रलेख

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील 100 वृत्तपत्रांत एकाच वेळी ट्रम्पविरोधी अग्रलेख प्रसिद्ध होणार आहेत. 16 ऑगस्ट रोजी अमेरिकेच्या 100 मीडिया हाऊसेसनी आपल्या अग्रलेखाचा विषय डोनॉल्ड ट्रम्प हा एकच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांच्या मीडियाविरोधी धोरणाचा कडाडून विरोध करत प्रत्येक वृत्तपत्र आपल्या भाषेत आणि आपल्या पद्धतीने ट्रम्प यांना इशाराच देणार आहे.

अमेरिकन मीडिया आणि अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांच्यात जणू वैरच निर्माण झालेले आहे. अमेरिकन मीडिया देशद्रोही आहे असे म्हणण्यापर्यंत ट्रम्प यांची मजल गेली आहे, तर त्यांचा विरोध करत ट्रम्प सरकारपासून मीडियाला धोका असल्याची भावना मीडियात निर्माण झाली आहे. ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेतील सारी वृत्तपत्रे एक झालेली आहेत.

-Ads-

ही ट्रम्पविरोधी मोहीम “बोस्टन ग्लोबल’ ने सुरू केली आहे. बोस्टन ग्लोबलने देशातील सर्व मीडिया हाऊसेसशी संपर्क साधून ट्रम्प यांच्या मीडियाविरोधी वृत्तीचा कडाडून विरोध करण्याचे आणि त्यांनी ती बदलावी असे आवाहन केले. मिळालेल्या माहितीनुसार रविवारपर्यंत 100 मीडिया हाऊसेसनी सहमती दर्शवली आहे. गुरुवारी सर्व वृत्तपत्रे ट्रम्पविरोधी अग्रलेख लिहून देशातील मीडियाला आणि लोकशाहीला ट्रम्प यांच्यापासून कसा धोका आहे हे स्पष्ट करणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)