अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात भारतवंशी महिला न्यायाधीश ? 

वाशिंग्टन (अमेरिका): अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात भारतवंशी महिला न्यायाधीश बनणार का? या प्रश्‍नाचे उत्तर लवकरच मिळणार आहे. त्या पदासाठी नाओंमी जहांगीर राव (45) या एका भारतवंशी महिलेचे नाव चर्चेत आहे. अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच नाओंमी जहांगीर राव यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी मुलाखत घेतली आहे. न्यायाधीश ब्रेट कावनाह यांच्या जागी हे नियुक्ती व्हायची आहे. लैंगिक शोषण प्रकरणामुळे ब्रेट कावनाह विवादात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार डीसी सर्किट न्यायालयातील न्यायाधीशाच्या पदासाठी नाओंमी जहांगीर राव यांच्या नावाची शिफारस व्हाईट हाऊसचे माजी वकील डॉन मॅकगॅन यांनी केलेली आहे. नेओंमी जहांगीर राव माहिती आणि नियामक मंडळाच्या प्रशासक आहेत. कावनाह यांच्या जागी एखाद्या अल्पसंख्याक महिलेची नियुक्ती करण्याचे ट्रम्प यांच्या मनात असल्याने त्यांना नेओंमी जहांगीर राव नियुक्तीची शक्‍यता बरीच जास्त आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)