अमेरिकेतील व्याजदरात पाव टक्‍क्‍यांनी वाढ 

वॉशिंग्टन  -अपेक्षेप्रमाणे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात पाव टक्‍के वाढ केली आहे. रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी सांगितले की, महागाई दोन टक्‍क्‍यांच्या आत राहील आणि रोजगारनिर्मिती व औद्योगिक उत्पादन पुरेसे वाढेल याची काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात व्याजदर वाढीची घोई केली जाणार नसल्याचे संकेत त्यानी दिले. या वर्षाच्या उरलेल्या काळात आणखी तीन वेळा व्याजदरात वाढ करण्याचे अगोदरच ठरले आहे.

मात्र, आणखी चार वेळा व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय होतो की काय अशी शंका घेतली जात होती. त्यामुळे गेल्या काही आठवड्यापासून जागतिक शेअरबाजारातही सावध वातावरण होते. ते म्हणाले की, वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेला धक्‍का बसेल असे काही काहीही केले जाणार नाही. आगामी काळात जर रोजगारनिर्मिती पुरेशी झाली आणि महागाई आटोक्‍यात राहिली तरच व्याजदर वाढीवर विचार करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. 2008 नंतर मंदी कमी करण्यासाठी अमेरिकेने व्याजदरात मोठी कपात केली होती. आता गेल्या दोन वर्षात अमेरिकेने व्याजदरात हळूहळू वाढ करण्यास सुरुवात केल आहे. ती वाढ 2019 पर्यंत चालण्याची शक्‍यता आहे. वेगात व्याजदरात वाढ केल्यानंतर महागाई वाढण्याचा धोका असल्यामुळे ठरविलेल्या वेळापत्रकाप्रमाणे व्याजदरात वाढ करण्यात येणार असल्याचे त्यानी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)