अमेरिकेतील ‘वुई आर शीख्स’ मोहिमेला ‘पीआर वीक युएस’ पुरस्कार

वॉशिंग्टन  : अमेरिकेत विद्वेषी गुह्यांच्या विरोधात शीख समुदायाकडून राबवण्यात आलेल्या ‘वुई आर शीख्स’ मोहिमेला पीआर वीक युएस पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराला जनसंपर्क क्षेत्रातील ऑस्कर म्हणून ओळखले जाते. तसेच हा अमेरिकेचा आघाडीचा पुरस्कार आहे. सार्वजनिक मुद्दे उपस्थित करण्यासाठी ‘वुई आर शीख्स’ मोहिमेचा गौरव करण्यात आला.

अमेरिकेत शिखांच्या विरोधात विद्वेषी गुह्यांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी एक स्वयंसेवी संस्था नॅशनल शीख संघटनेने (एनएससी) ‘वुई आर शीख्स’ मोहीम राबविली होती. या मोहिमेचा उद्देश अमेरिकेच्या जनतेत शीख धर्माबद्दल जागरुकता निर्माण करणे होता. संस्थेला हा पुरस्कार शिखांना सामान्य अमेरिकन दर्शविणे आणि धर्माच्या आधारावर भेदभाव रोखण्यासाठी चालविण्यात आलेल्या मोहिमेकरता मिळाला आहे. या पुरस्कार सोहळय़ाचे आयोजन न्यूयॉर्कमध्ये करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)