अमेरिकेतील मियामी विमानतळ उडवण्याची धमकी देणाऱ्यास उत्तरप्रदेशात अटक 

लखनौ: अमेरिकेतील मियामी विमानतळ उडवून देण्याची धमकी देणाऱ्या इसमास उत्तरप्रदेशातून अटक करण्यात आली आहे. त्याने अमेरिकेतील अधिकाऱ्यांना फोनवरून या धमक्‍या दिल्या. अमेरिकन सुरक्षा यंत्रणेकडून भारतातील यंत्रणांना ही माहिती देण्यात आल्यानंतर उत्तरप्रदेशातील दहशतवाद विरोधी पथकाने या इसमाला ताब्यात घेतले. या इसमाची ओळख मात्र पोलिसांनी जाहीर केलेली नाही.
या इसमाने एक हजार डॉलर्सची बिटकॉइॅन्स खरेदी केली. त्यातून त्याची फसवणूक झाली. त्या विषयी त्याने एफबीआयकडे तक्रार केली पण त्यावर त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे तो संतापला होता. त्यामुळे त्याने मियामी विमानतळ उडवून देण्याची धमकी दिली. मी स्वत: एके 47 रायफल घेऊन येईन आणि तेथे सगळ्यांना उडवून लावण्याची धमकी दिली होती. 2 ऑक्‍टोबर ते 31 ऑक्‍टोबर या कालावधीत त्याने धमकीचे अनेक कॉल केले होते.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)