अमेरिकेतील मध्यावधी निवडणूकांमध्ये ट्रम्प यांना धक्का 

प्रतिनिधीगृहात डेमोक्रॅटिक पक्षाला यश : सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाने बहुमत राखले 

वॉशिंग्टन: अमेरिकेतील मध्यावधी निवडणूकीमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाला कनिष्ठ सभागृहात मोठे यश मिळाले आहे. हा निकाल म्हणजे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ट्रम्प यांच्या दोन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ध्रुवीकरण आणि एकाधिकारशाहीचेच प्रत्यंतर या निवडणूकीच्या निकालामध्ये दिसते आहे. “हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज’मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाने बाजी मारली तर “सिनेट’मधील निवडणूकीमध्ये रिपब्लिकन पक्षाने आपले बहुमत कायम राखले आहे. त्यामुळे अमेरिकेच्या संसदेवरील नियंत्रण दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांमध्ये विभागले गेले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या प्रतिनिधीगृहामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाने 23 जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. व्हर्जिनिया, फ्लोरिडा, पेनसिल्व्हेनिया आणि कोलोरोडो या राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाचा पराभव करून डेमोक्रॅटिक पक्षाने विजय मिळवला आहे. ट्रम्प प्रशासनाविरोधात जनमत किती तीव्र आहे, याचे प्रत्यंतर या निवडणूक निकालांवरून दिसते आहे.

सिनेटमध्ये मात्र रिपब्लिकन पक्षाने आपले बहुमत कायम राखले आहे. आर्थिक असुरक्षितता आणि अमेरिकेचे स्थलांतरितांच्या मुद्दयावर ट्रम्प यांनी निर्माण केलेल्या असुरक्षिततेचा मुद्दा संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये ट्रम्प यांच्याबाजूने कौल देणारा ठरला. इंडियाना, मिसुरी आणि नॉर्थ डकोटा या राज्यांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाकडून रिपब्लिकन पक्षांनी विजय खेचून आणला. फ्लोरिडा, आयओवा आणि ओहिवा या राज्यांमध्ये ट्रम्प यांच्या राजकीय समर्थकांनी गव्हर्नरपदाच्या निवडणूका जिंकल्या.

अमेरिकेमध्ये काल मध्यावधी निवडणुकीसाठी मतदान झाले. वरिष्ठ सदनातील (सीनेट) 100 पैकी 35 जागा आणि कनिष्ठ सदनामध्ये (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्ह) 435 जागांवर खासदार निवडले गेले. काही जागांचे निकाल अद्याप यायचे असले तरीही बहुमताचा आकडा दोन्ही सभागृहात पार झाला आहे. सीनेटमध्ये 100 पैकी ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने 51 जागा जिंकत वर्चस्व कायम राखले आहे. मात्र, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हमध्ये ट्रम्प प्रशासनाला नामुष्की सहन करावी लागली आहे. डेमॉक्रेटीक पक्षाने बहुमताचा 218 हा आकडा पार केला असून ट्रम्प यांना 193 जागा मिळाल्या आहेत.

माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही अशाच अडचणीला सामोरे जावे लागले होते. त्यांची महत्वाकांक्षी योजना ओबामा केअरला कनिष्ठ सभागृहात डेमॉक्रेटीक पक्षाचे बहुमत नसल्याने माघार घ्यावी लागली होती. आता ट्रम्प प्रशासनावरही हीच वेळ येणार असून त्यांची ताकद कमी होण्याचे हे संकेत आहे. दोन्ही सदनांमध्ये गेल्या 84 वर्षांत केवळ तीनवेळा एकाच पक्षाला वर्चस्व राखने शक्‍य झाले आहे.

हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज, सिनेट आणि गव्हर्नरपदाच्या या मध्यावधी निवडणूकीचे सर्व निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. ज्या महत्वाच्या जागांचे निकाल जाहीर होत आहेत, त्यानुसार समाधानकारक यश मिळाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. तर ट्रम्प यांच्या धोरणांचे अपयश या निवडणूकीत दिसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)