अमेरिकेतील बॅंकेत बंदुकधाऱ्याने पाच जणांची हत्या केली 

मियामी (अमेरिका) – एका बंदुकधाऱ्याने बॅंकेत किमान पाच जणांची हत्या केल्याचे पोलीसांनी सांगितले आहे. फ्लोरिडामधील सेब्रिंग येथील बॅंकेत ही घटना धडली आहे. अत्यंत निर्दयपणे पाच जणांची हत्या करण्यात आली असल्याचे पोलीस प्रमुख कार्ल हॉगलॅंड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, खुन्याला अटक करण्यात आली आहे. तो 21 वर्षांचा युवक असून तो सेब्रिंगचाच रहिवासी आहे. त्याने या हत्या कशासाठी केल्या हे समजू शकले नाही. पुढील तपास चालू असल्याचे हॉगलॅंड यांनी सांगितले.

अंदाधुंद गोळीबाराने सामूहिक हत्याकांड ही अमेरिकेतील नित्याची गोष्ट झालेली आहे. सन 2017 मध्ये अशा गोळीबारांमध्ये 40,000 पेक्षा अधिक लोक मारले गेल्याची माहिती सीडीसीपी (सेंटर फॉर डोसीज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शन) ने दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इतक्‍या मोठ्या प्रमाणावर हत्या होऊनही त्यावर कायदेशीर उपाययोजना मात्र होऊ शकत नाही. हत्यारांवरील कडक नियंत्रणाला नॅशनल रायफल असोसिएशन आणि तिचे समर्थक यांच्याकडून होणारा विरोध हे त्याचे मोठे कारण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)