अमेरिकेतील पार्कमध्ये दरीत कोसळून भारतीय दाम्पत्य ठार

न्युयॉर्क: कॅलिफोनिर्याच्या योसोमाईट नॅशनल पार्कमध्ये आठशे फूट दरीत कोसळून एक भारतीय दाम्पत्य ठार झाल्याची घटना घडली आहे. विष्णु विश्‍वनाथ (वय 29) आणि मीनाक्षी मुर्ती (वय 30) अशी ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. ते दोघे पती पत्नी आहेत आणि ते सोमवारी या पार्कमध्ये गेले असताना ही घटना घडली.

दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. विश्‍वनाथ हे सिस्को कंपनीत सिस्टीम इंजिनीअर म्हणून काम करीत होते ते सॅन जोसे येथे राहात होते. साहसी क्रीडा प्रकारासाठी ते या पार्क मध्ये आले होते असे वृत्त येथील एका दैनिकाने दिले आहे. गुरूवारी दरीतून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. ही घटना नेमकी कशी घडली याची आम्हाला कल्पना नाही आम्ही त्याची माहिती घेत आहोत असे पार्कच्या व्यवस्थापकाने सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)