अमेरिकेतील कॉल सेंटर घोटाळ्यात 7 भारतीय

2 हजार जणांची 5.5 दशलक्ष डॉलरची फसवणूक
शिकागो – अमेरिकेमध्ये लक्षावधी डॉलरचा कॉल सेंटर गैरव्यवहारामध्ये भारतातील 5 कॉलसेंटर आणि 7 भारतीयांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी एकूण 15 जणांचा सहभाग निश्‍चित झाला आहे. या सर्वांनी मिळून अमेरिकेतील 2 हजार नागरिकांची तब्बल 5.5 दशलक्ष डॉलरची फसवणूक केली आहे, असे न्याय विभागाने म्हटले आहे.

या घोटाळ्यामधील कॉल सेंटर कर्मचारी संभाव्य ग्राहकांना हेरून अंतर्गत महसूल सेवेचे अधिकारी असल्याची बतावणी करत असत आणि कर्जाची योजना देऊ करत असत. नंतर सरकारला दंड किंवा कर न भरल्याची बतावणी करून अटक करण्याची किंवा तुरुंगवासाच्या शिक्षेच्या भीतीने धमकावत असत. बनावट नावांनी उघडलेल्या खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास ग्राहकांना सांगितले जात असे. या प्रकरणी सातजणांना गुरुवारी अटक करण्यात आली. हे 7 जण आणि अहमदाबादेतल्या कॉल सेंटरच्या 5 जणांवर गैरव्यवहारातील सहभागाचा आरोप ठेवण्यात आला आहे.

2012 ते 2016 दरम्यान अहमदाबादेतील कॉलसेंटरच्या माध्यमातून अधिकारी असल्याची बतावणी करून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक केली जात होती. भारतीय कॉलसेंटरमधून अमेरिकेतील असुरक्षित नागरिकांची माहिती डाटा ब्रोकरच्या माध्यमातून मिळवली जात असे आणि महसूल अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक केली जात असे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)