अमेरिकेच्या सैन्यात ट्रान्सजेंडर्सला प्रवेश नाही

वॉशिंग्टन : अमेरिकेत आता ट्रान्सजेंडर्सला सैन्यात काम करण्याची संधी मिळणार नाही. कारण व्हाइट हाउसने सैन्यात ट्रान्सजेंडर्सची भरती आणि सेवांबद्दल नव्या नियमांची घोषणा केली. यातंर्गत काही विशेष स्थिती वगळता ट्रान्सजेंडर्सला सैन्यात नोकरी दिली जाणार नाही.

ओबामा प्रशासनाने 2016 मध्ये सैन्यात ट्रान्सजेंडर्सच्या भरतीसाठी नियम तयार केले होते. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रान्सजेंडर्ससाठीचे जुने धोरण रद्द केले आहे. त्याच्या जागी आता नवे धोरण लागू होईल. नव्या धोरणामुळे सैन्याला मानसिक आणि शारीरिक रुपाने सुदृढ व्यक्तींची भरती करणे शक्य होणार असल्याची माहिती व्हाइट हाउसच्या माध्यम सचिव सारा सँडर्स यांनी दिली.

या अगोदर जुलै 2017 मध्ये ट्रम्प यांनी सैन्यात ट्रान्सजेंडर्सवर बंदी घालण्याची घोषणा ट्विटरद्वारे केली होती. यासाठी त्यांनी एका आदेशावर स्वाक्षरी देखील केली होती. परंतु तेव्हा पूर्ण अमेरिकेत नव्या धोरणाला विरोध सुरू झाला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)