अमेरिकेच्या शाळांमध्येही साजरे होणार भारतीय सण

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. भारतात दरवर्षी मोठ्या  उत्साहात साजरा केल्या जाणाऱ्या दिवाळी सणाच्या दिवशी अमेरिकेच्या शाळा देखील उजळून निघणार आहेत. न्यूजर्सी, न्यूयॉर्क, पेन्सिलवेनिया, मॅसाच्युसेट्स आणि मेरीलँडच्या काही जिल्ह्यांमधील अनेक शाळा सणानिमित्त बंद राहणार आहेत. काही शाळांनी सणासाठी अर्ध्या दिवसाची तर काहींनी पूर्ण दिवसाची सुटी जाहीर केली.

अमेरिकेच्या शाळांद्वारे उचलण्यात आलेले हे पाऊल दिवाळीची लोकप्रियता वाढवणारे आहे. अमेरिकेच्या शाळांकडून उचलण्यात आलेले हे पाऊल एक सकारात्मक पाऊल असल्याचे उद्गार हिंदू नेते राजन जेड यांनी काढले आहेत. राजन जेड युनिव्हर्सल सोसायटी ऑफ हिंदुइझमचे अध्यक्ष आहेत. हिंदूबहुल विद्यार्थ्यांची संख्या असणाऱया शाळांमध्ये दिवाळीदिनी सुटी जाहीर करावी असे आवाहन राजन यांनी मेरीलँड, न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीच्या अन्य शासकीय तसेच खासगी शाळांना केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिवाळी हिंदूंसाठी स्वतःच्या कुटुंबासोबत साजरा करण्याचा सण असल्याने शाळांनी एक दिवसाची सुटी द्यावी असे राजन म्हणाले. अन्य धार्मिक निमित्तांना शाळा सुटी देत असतील, तर दिवाळीला का नाही?  मोठमोठय़ा धर्मांच्या सणांचा सन्मान केला जावा. अन्य सणांप्रमाणेच दिवाळीबद्दल अमेरिकेत राहत असलेल्या हिंदू विद्यार्थ्यांना जागरुक केले जावे. दिवाळी हिंदूंचा सर्वात मोठा सण असल्याचे राजन यांनी सांगितले. अमेरिकेते सुमारे 30 लाख हिंदूंचे वास्तव्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)