अमेरिकेच्या विमानतळावर पाकच्या पंतप्रधानांचे उतरवले कपडे

वॉशिंग्टन: पाकिस्तानच्या पंतप्रधानांची वॉशिंग्टनमधील जे.एफ.केनेडी विमानतळावर सुरक्षेच्या कारणास्तव कपडे उतरवून तपासणी करण्यात आली. शाहीद खाकान अब्बासी यांची बहीण अमेरिकेत राहते. ती सध्या आजारी आहे. तिची विचारपूस करण्यासाठी अब्बासी खासगी दौऱ्यावर होते. यादरम्यान हा प्रकार घडला.

पाकिस्तानी टीव्ही चॅनल्सनुसार, अब्बासी यांची सामान्य नागरिकांप्रमाणे कपडे उतरवून तपासणी करण्यात आली. खासगी दौ-यातही अशाप्रकारे एखाद्या पंतप्रधानांची तपासणी करणं अपमान असल्याचं पाकिस्तानी मीडियाने म्हटले आहे. या दौ-यात अब्बासी यांची अमेरिकेचे उपराष्ट्रपती माइक पेंस यांच्याशीही भेट झाली असे सांगितले जात आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

2 COMMENTS

  1. वरील वृत्त वाचण्यात आले आपल्या देशातील अनेक अतिविशिष्ट व्यक्तींना वरील प्रकारची वागणूक दिल्याच्या घटना वाचण्यात आल्यात माजी राष्ट्रपती अब्दूल कलाम आझाद हे सुद्धा ह्यातून सुटले नव्हते परंतु पाकिस्तान बाबत हि घटना प्रथमच असावी असे समजल्यास चूक ठरू नये काही वर्षा अगोदर पाकिस्तानच्या राजकारण्यांची समजूत घालण्यासाठी अमेरिकेचे मंत्राची पाकिस्तानला यावयाचे हिलरी क्लिंटन परराष्ट्रमंत्री असताना अमेरिकेत पाकिस्तानच्या त्या वेळेसच्या परराष्ट्र मंत्री ह्या सुद्धा तरुण स्त्री होत्या भर मिटिंग मद्धे बेंबाव झाल्याने प्रस्तावाचे कागत भिरकावून पाकिस्तानला परतल्या असताना त्यांची समजूत घालण्यासाठी श्रीमती हिलरी क्लिंटन स्वताहा लगोलग पाकिस्तानला आल्याहोत्या ह्या घटनेमुळे भारत दुखू नये म्हणून त्या भारतात आल्या असता त्यांनी विषारी साप पोसल्यास तो केव्हाही उलटण्याची शक्यता असते हे वृत्त महाराष्ट्र टाइम्स मधून वाचण्यात आले होते त्या काळी अमेरिका पाकिस्तानच्या बोटावर नाचत असे आजच्या परिस्थितीत पाकिस्तान बाबतच्या धोरणात यु टूर्न बदल होऊन पंतप्रधानचे कपडे उतारावियापर्यंत मजल जाते ह्या मागील कोणते कारण असावे ? मुळात अमेरिकेच्या पैशावर ज्या देशांचा संसार सुरु आहे त्या देशातील कितीही मोट्या व्यक्तीला अधिकार पदावर नसल्यास त्यांच्या मनात आल्यास सर्वसामान्य प्रमाणेच वागणूक देण्यात येते अब्दुल कलाम आपल्या देशातील ताजे उदाहरण आहे ह्या विरोधात ब्र काढण्याची कोणत्याहीअमेरिकेच्या पैशावर जगणार्या देशाची हिम्मत होत नाही परंतु पाकिस्तान ह्या साठी आजपर्यंत अपवाद होता त्या कारणानेच पाकिस्तान ह्याची परतफेड कशी केव्हा कशा पद्धतीने करतो हे पाहणे महत्वाचे ठरावे

  2. संपादक , युनिकोड बाबत आपली I मेल मिळाली युनिकोड बाबत मला गंधही नाही पांढर्या कोंडाबाबत माहिती आहे वरील बातमी मला महाराष्ट्र टाइम्स मधून वाचण्यात आली माझ्या कडे हा पेपर फुकट येतो व आपला पेपर मी इ -पेपर वर वाचत असतो मुख्य बातमीत वरील वृत्त आपल्या इ -पेपर मध्ये वाचवायस न मिळाल्यानेच माझी प्रतिक्रिया आपणास जी पाठविली ती हि वरील वृता बाबतच होती युनिकोड बाबत आपणच खुलासा केल्यास माझया ज्ञानातं भरच पडेल

    कळावे , आपला एक वाचक अरविंद रामचंद्र गोखले , वारजे पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)