जेरूसलेम : अमेरिकेने जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देत तेथे स्वतःचे दूतावास कार्यलय स्थलांतरीत केले आहे. 70 वर्षे जुन्या विदेश धोरणाच्या विरोधात उचललेल्या या पावलाने पूर्ण अरब जगत तसेच अमेरिकेचे सहकारी देश देखील नाराज झाले आहेत. पूर्वीच्या अमेरिकेच्या धोरणानुसार जेरूसलेमचे भविष्य इस्रायल आणि पॅलेस्टाईनला चर्चेद्वारे निश्चित करायचे होते.

जेरूसलेमची लोकसंख्या 8.82 लाख असून शहरात 64 टक्के ज्यू, 35 टक्के अरब आणि 1 टक्के अन्य धर्मीय राहतात. शहराचे क्षेत्रफळ 125.156 चौरस किलोमीटर आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोघेही जेरूसलेमला राजधानी करू इच्छितात. या ऐतिहासिक शहरात मुस्लीम, ज्यू आणि ख्रिश्चन समुदायाच्या धार्मिक मान्यतांशी संबंधित प्राचीनस्थळे आहेत.

1980 मध्ये इस्रायलने जेरूसलेमला राजधानी घोषित केले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने प्रस्ताव संमत करत पूर्व जेरूसलेमवरील इस्रायलच्या कब्जाची निंदा केली तसेच याला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन ठरविले. 1980 च्या अगोदर जेरूसलेममध्ये नेदरलँड आणि कोस्टा रिका यासारख्या देशांचे दूतावास होते. परंतु 2006 पर्यंत या देशांनी स्वतःचा दूतावास तेल अवीवमध्ये हलविला. आंतरराष्ट्रीय समुदायाने जेरूसलेमवरील इस्रायलच्या अधिपत्याला विरोध केला असल्याने तेल अवीवमध्येच सर्व 86 देशांचे दूतावास आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)